मी शेतकरी नेते शरद जोशी यांच्या विचारांचा चाहता असल्याचे सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना उन्नतीचा कानमंत्र सांगितला. इथेनॉलच्या मदतीने आपण स्मार्ट शहरांप्रमाणे स्मार्ट व्हिलेज तयार करु, अशी प्रतिक्रिया त्यांनी लोकसत्ता इथेनॉल परिषदेत बोलताना दिली.